माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
नगर पंचायत तसेच पोलीस प्रशासन कडुन माणगाव बाजार पेठेतील अतिक्रमण मोहीम हटाव उपक्रम सोमवार दि.27 जानेवारी 2025 रोजी हाती घेण्यात आला होता…. माणगाव बाजार पेठेत रहदारी तसेच वाहतूक अडथळा फार मोठ्या प्रमाणे होत असल्याने ही मोहीम माणगाव नगर पंचायत तसेच माणगाव पोलीस मार्फत हाती घेण्यात आली…सदर कारवाई ही सायंकाळी उशिरा पर्यंत चालू असल्याचे पाहायला मिळाले….यावेळी माणगाव पोलीस पी.आय. नीवृत्ती बो-हाडे, मुख्याधिकारी संतोष माळी, नगर पंचायतीतील कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते….यादरम्यान वाहतुकीस तसेच रहादारीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याने प्रचंड वाहतूकदिवसेंदिवस वाढत असल्याने बाजार पेठेत प्रचंड वाहतूकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे….याठिकाणी ग्राहकांची वर्दळ आणि त्यातच पार्किंग, फेरी वाले, काही दुकाने हे रस्त्याच्या पादचारी रस्त्यापर्यंत आपली दुकाने पुढे आणून रस्ता काबीज करुन अजूनच बिकट समस्या केल्याने बाजारात खरीदी व्यवहार करण्यास आलेल्या ग्राहकांना फिरण्याचा तसेच ये जा करण्यास त्रास होत असल्याचे चित्र दिसत आहे…. दरम्यान हीच मोहीम दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण तसेच अनधिकृत हटाव कारवाई बामणोली रोड, मोर्बा रोड कॉर्नर, निजामपूर रोड अशा विविध महत्वाच्या ठिकाणी वर्दळ पाहायला मिळते… याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नगर पं.कडुन संबंधितांना लेखी नोटीस देऊन त्यात नमूद केले की येत्या 48 तासात अतिक्रमण हटवा…. तर दुसरीकडे अनेकांना याबाबत सूचना देण्यात आल्या मात्र यात दुर्लक्ष केल्याने पंचायत समितीला नोटीसद्वारे कळविले की, नगर पंचायतीने खुद्द कारवाई करून अतिक्रमण हटवून झालेला खर्च वसुल करून नगर पंचायत तसेच पोलीस प्रशासनातर्फे अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भेट देण्यात आली…
या कारवाईबद्दल अनेकांनी स्वागत केले आहे…यावेळी व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण आबा दळवी यांनी अतिक्रमण तसेच अनधिकृत केलेले बांधकाम हटवत असतील तर ती गोष्ट नक्कीच चांगली असल्याचे सांगितले आहे…. या दरम्यान माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनीही काही दिवसापूर्वी बोलताना सांगितले होते की, नव्याने मोर्बा रोड, बामणोली रोड, येथील शेतकऱ्यांनी स्वतःहून रस्त्यासाठी होत असलेला अडथळा दूर करुन सहकार्य केले तर नगर पंचायत मुख्य बाजार पेठेतील अतिक्रमण का हटवत नाही ? तर याबाबत न.पं. दुर्लक्ष केले तर आंदोलन करणार असल्याचे बोलताना सांगितले… या केलेल्या मागणीला माणगाव न.पं. अखेर ऍक्षन मोडवर येऊन अतिक्रमण, अनधिकृत कारवाई करताना पाहायला मिळत आहे… दुसरीकडे दुसऱ्या दिवसाच्या विशेष करुन बामणोली रोड येथील कारवाई गेली अनेक वर्ष अडथळा ठरत असलेल्या “बॉटल नेक स्पॉट” हटवल्याने सदर स्पॉट आता मोकळा झाल्याने वाहतूक कोंडी सुटल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे….