संदीप पाटील यांचा गोगोदे बुद्रुक येथे शिक्षण हक्क सत्याग्रह… मोफत शिक्षणासाठी बेमुदत उपोषण…

0
54

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-

           समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत शिक्षण मिळावे यासाठी संदीप रेणुका परशुराम पाटील हे पेण तालुक्यातील शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारी पासून बेमुदत उपोषण करणार आहेत.. अर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे…. कंत्राटी कामगाराला कंपनीमध्ये 10 ते 12 हजार पगारावर काम करावे लागत आहे…. इको- मिनीडोअर चालक, रिक्षा चालक, टेम्पो चालक यांना महिन्याला 10 ते 12 हजार रुपये मिळत आहेत…. वीट भट्टी कामगार, कोळसा भट्टी कामगार, हंगामी मजूर, शेतमजूर, घरेलू कामगार, रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते, छोटे व्यवसायिक यांचे मासिक उत्पन्न 5 ते 6 हजार रुपयांवर आले आहे… महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे हे मुश्किल झालेले आहे… रायगड जिल्ह्यातील पटसंख्या अभावी 300 हून अधिक शाळा बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील 14000 शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत… याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील 300 गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागत आहे आणि महाराष्ट्रातील 41000 गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे… 

         सध्या शिक्षणाच्या खाजगीकरणाने शैक्षणिक फी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आपल्या मुलांना शिकवायचे कसे ? हाच प्रश्न सर्व समाजाला सतावत आहे…. पहिलीच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्च 35 ते 40 हजार रुपये, अकरावी बारावीच्या मुलांचा शैक्षणिक खर्च 2 ते 3 लाख रुपये, एमबीए साठी शैक्षणिक खर्च 5 ते 6 लाख रुपये, इंजिनीयर होण्यासाठी खर्च 12 ते 15 लाख रुपये, डॉक्टर होण्यासाठी 60 ते 70 लाख रुपये खर्च होते… आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सर्व समाजातील गरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत…. भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे… अन्न ही जशी सर्वांची समान भूक आहे तसेच ज्ञान सुद्धा सर्वांची समान भूक आहे…. ज्ञाना अभावी माणसाची विचार करण्याची शक्ती थांबते आणि माणूस सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला राहतो… म्हणून ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ज्ञान हे मिळालेच पाहिजे अशी संदीप पाटील यांची मागणी आहे….     समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर, पीएचडी, इंजिनीअर, वकील, डॉक्टर, एमबीए वगैरे पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे, रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे तसेच अन्य मागण्यांसाठी म्हणून 30 जानेवारी 2025 पासून संदीप रेणुका परशुराम पाटील हे पेण तालुक्यातील शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान गागोदे बुद्रुक येथे बेमुदत उपोषण करणार आहेत… सर्व समाजाने शिक्षण हक्क सत्याग्रहात सामील व्हावे असे आवाहन संदीप  पाटील यांनी केले आहे….