पनवेल बस स्थानकात चक्का जाम आंदोलन…एसटीच्या भाड्यात १५% वाढीच्या निर्णया विरोधात आंदोलन…

0
94

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल) :-

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर साहेब यांच्या उपस्थित तसेच रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळाने नुकताच एसटीच्या भाड्यात १५% वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने आज पनवेल बस स्थानक (डेपो) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले..!
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, शेकापचे गणेश कडू, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहीते, सर्व शहर प्रमुख, महिला आघाडीच्या तालुका संघटीका सौ. सुजाता कदम, महानगर संघटीका सौ.लीना गरड यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…