रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत नीवीगावाच्या गणपती घाट येथे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते खुल्या व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले… ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच, रोह्यातील युवा नेतृत्व अमित मोहिते, रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक रामचंद्र नाकती त्याचप्रमाणे श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत याची निर्मिती करण्यात आली या व्यायाम शाळेमुळे जवळपास नीवी, भुवनेश्वर ,वरसे ,लांडर, तळाघर आदी गावातील नागरिकांना याचा मोफत लाभ घेता येणार आहे…
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मधुकर पाटील, सुरेशजी मगर, ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेश पाटील, रामा म्हात्रे, सतीश भगत, जयवंत दादा मुंडे, सदस्य गणेश शिवणकर, शांतीशिल तांबे, आतिश पडवळ, उतेश कांबळे आदी सदस्य आणि निवी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…