सनशाइन प्री प्रायमरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा… चिमुकल्यांनी केला सांस्कृतिक कार्यक्रम सादर…

0
105

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

खालापूर तालुक्यातील चांभालीऀ येथील सनशाइन प्री प्रायमरी स्कूलचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला…. यावेळी चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वाह वाह मिळवली तर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले….या स्नेहसंमेलनाला जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती तथा वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ.उमा संदीप मुंढे व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य संदीप शेठ मुंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते….सनशाइन प्री प्रायमरी स्कूलचे नर्सरी ते सिनियर केजीच्या चिमुकल्यांनी यावेळी आपले कला गुण सादर करुन वाह वाह मिळवली. तर प्राविण्य प्राप्त चिमुकल्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले…. यावेळी सनशाइन प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. योगिनी गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे स्वागत केले…..