तांबाटी ग्रा.पं.उपसरपंचपदी सेनेचे नितीन कदम बिनविरोध… अभियान पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार:अविनाश आम्ले…

0
42

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत तांबाटीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे नितीन गजानन कदम यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे… खालापूर तालुक्यातील आर्थिक सक्षम असलेली तांबाटी ग्रामपंचायत आहे… कार्यक्षम आणि सक्षम म्हणून तिचा उल्लेख आढळतो… उपसरपंच सौ.शितल पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने आज सरपंच अविनाश आम्ले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड पार पडली… सकाळी नामांकन अर्ज दाखल करताना फक्त नितीन गजानन कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत तांबाटी कार्यालयात आयोजित केलेल्या निवडणुक बैठकीत नितीन कदम हे बिनविरोध निवडून आल्याचे सरपंच अविनाश आम्ले यांनी जाहीर केले…
शिवसेना आमदार महेन्द्र थोरवे यांचे बंधू विश्वनाथ थोरवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, सरपंच अविनाश आम्ले, सर्व सदस्य यांनी नितीन कदम यांचे अभिनंदन केले… नितीन गजानन कदम हे दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आले असून माजी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कार्यरत होते… एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून छत्तिशी विभागात त्यांच्याकडे पाहिले जाते… ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी हिने कोकण विभागात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक पटकावला आहे…. पर्यावरण संतुलन आणि माझी वसुंधरा अभियान ५.० हे अभियान पुढे नेण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून, नागरी समस्या आणि स्थानिक उद्योग क्षेत्रात येथिल बेरोजगार यांना संधी देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगून सरपंच अविनाश आम्ले व सर्व सदस्य यांचे आभार नव निर्वाचित उपसरपंच नितीन गजानन कदम यांनी व्यक्त केली…