पेण शिक्षण महिला समितीच्या शैक्षणिक संकुलात पेट्रोल बॉम्बचा भ्याड हल्ला… विद्यार्थ्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध…

0
40

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

पेण शहरातील कुंभार आळी येथील असणाऱ्या पेण शिक्षण महिला समितीच्या श्री.सुमतीबाई वि.देव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दि.२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकां कडून काचेच्या बाटलीत पेट्रोल बॉम्ब टाकून याद्वारे भ्याड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर विद्यालयामार्फत दि.१ ते २ फेब्रुवारी यादरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट-गाइड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

सदर शिबिर यशस्वीरीत्या पाड पडत असताना दि. २ फेब्रुवारी रोजी पहाटे सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काऊट गाईडसाठी उभारण्यात आलेल्या तंबूवर तीन काचेच्या बाटल्यांद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले असता तात्काळ त्या ठिकाणची आग पाण्याच्या द्वारे विझविण्यात आली… यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही… मात्र असे वृत्त करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे तपास करीत आहेत…

ह्या घटनेची माहिती मिळताच सदर शैक्षणिक संकुलात जाऊन पोलिसांनी जागेची पाहणी केली आहे… ज्या समाजकंटकांनी शाळेच्या आवारात बाटली द्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला आहे… त्याचा तपास करण्यात येत असून शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत…तरी सुद्धा उर्वरित आजूबाजूचे ही सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी लवकरात लवकर केली जाईल व यातील आरोपींचा यथा शोध घेण्यात येईल…