जोगेश्वरी शिवसत्ता टाइम्स (पूनम पाटगावे):-
जोगेश्वरी पोलीस ठाणे, मुंबई अंतर्गत जोगेश्वरी निर्भया पथकाकडून ०४/०२/२०२५ रोजी ६.१५ वा. ते ७. ०० वा. दरम्यान सांगली वैभव सोसायटी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई याठिकाणी म.पोउपनि. सातपुते म. पो.शि. कुलवडे यांच्या उपस्थितीत निर्भया पथकाचे अधिकारी पोउनि सातपुते व पथक यांनी नागरिकांना खालील प्रमाणे माहिती दिली. देशभरात १ जुलै २०२४ रोजी पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे झालेले बदल आहेत, अशी माहिती नागरिकांना देण्यात आली.