उरण तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)  काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ… 

0
57

उरण  शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
आजच्या राजकारणात पक्षांतराच्या घडामोडी दररोजच पहायला मिळतात… उरणमध्येही राजकीय पक्षांतराची लागण लागली आहे… उरण काँग्रेसमधील नाराज गट आणि राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार गट ) नाराज कार्यकर्ते माजी तालुकाध्यक्ष पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजते…
उरण काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अंतर्गत नाराजीचा सूर वाढत चालला आहे… पक्षात ज्यांची पत नाही अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठांची मर्जीने त्यांना मानाची पदे दिली जात आहेत… ज्यांच्याकडे मतदानाच्या दिवशी टेबल मांडण्यासाठी देखील कार्यकर्ते नसतात व स्वतःच्या घरातील व्यक्ती शिवाय मतदार नसतात, त्यांच्याकडे पदांची खिरापत वरिष्ठांकडून वाटली जाते… तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेतल्यानेच या दोन्ही निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली असल्याचा आरोप काही पदाधिकारी खासगीत करत आहेत…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कोणत्याही प्रकारची मोर्चेबांधणी करण्यासाठी नियोजन केले जात नाही, तसेच पक्षात उरणमधील ठराविक पदाधिकाऱ्यांनाच मान मिळत असल्याने नाराज पदाधिकारी वेगळी चूल मांडून सत्ताधारी राष्ट्रवादी गटात (अजितदादा पवार) सामील होण्याच्या तयारीत असल्याचे समजते, तसेच उरण नगरपालिकेत गेल्या १० वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा एकही नगरसेवक नाही… तर उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा एकही  सरपंच नाही आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)  पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष नामधारी असून काही  पदाधिकारी बॅनरपुरतेच आहेत…
राष्ट्रवादीचे  नेते प्रशांत पाटील यांच्या अकस्मात निधानाने राष्ट्रवादी पक्ष रसातळाळा गेला आहे, एका महिलेचा मनमानी कारभार चालला असल्याचे राष्ट्रवादीचे  कार्यक्रते सांगत आहेत… याबाबत नुकतीच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर बैठक संपन्न झाली… या बैठकीत उपस्थितांनी आपली नाराजी व्यक्त करीत आपण सत्ताधारी गटात सामील होण्याचे ठरवले आहे… त्यामध्ये आपले गेली अनेक वर्षे सहकारी असलेले खासदार सुनील तटकरे यांच्या बरोबर चर्चा करून आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी प्रयत्न करूया, असे ठरले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजली आहे….
उरण काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश येते की, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात प्रवेश करतात याकडे लक्ष लागले आहे… उरण काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात नाराज मोठ्या प्रमाणात असून, लवकरच त्याचा स्फोट होईल, अशी माहिती उरण काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच माजी तालुकाध्यक्ष, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना…. ते नाराज असून राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे….