उरणमधून ७ बांगलादेशींना अटक… बांगलादेशींमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा…

0
107

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

उरणसह द्रोणागिरी परिसरात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण खूप वाढले आहे… अनेक बांगलादेशी घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय असल्याचे पुरावे तयार करुन वर्षानुवर्षे नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत… तसेच या घुसखोरांकडून सरकारी योजनांचा लाभ घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड होत आहे… आता या घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर राज्यव्यापी कारवाई सुरू झाल्याने नवी मुंबईतून आतापर्यंत अनेक बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे… त्यातच उरणमधील एका बांधकाम साईटवरून सात बांगलादेशींना मंगळवारी नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे… उरणमधील द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुप या विकासकाचे बांधकाम सुरू आहे… या साईटवरील लेबर कंत्राटदाराकडे हे बांगलादेशी कामगार होते… तशी माहिती पोलिसांना खबऱ्यांनी दिल्यानंतर उरण पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून गामी ग्रुपच्या बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली… त्यात सात पुरुष मजूर बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले… त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत… उरणसह उलवे, पनवेल, नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात गृहनिमार्ण, पुनर्विकासाची कामे जोरात सुरू आहेत… त्यामुळे इथे कामगारांना मोठी मागणी आहे… गेल्या वर्षी देखील नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या शोध मोहिमेत अनेक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली… फेरीवाला, मजूर काम, गृहसेविका, लेडिज सर्व्हिस बार अशा वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर नाव बदलून तसेच भारतीयत्वाचे बनावट कागदपत्रे बनवून राहात असल्याचे पोलिसांना आढळले आहे…

उरण परिसरात बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा येते… कमी पैशात काम करत असल्याने स्थानिकांऐवजी घुसखोरी केलेल्यांना कामाची संधी मिळते… आता ज्या बांधकाम व्यावसायिकाकडे बांगलादेशी कामगार होते, त्यांनी कशाच्या आधारावर त्यांना कामावर ठेवले, त्यांच्यावरही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे… दरम्यान, या बांगलादेशींची रवानगी त्यांच्या देशात करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत…