पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-
छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेण येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर मनसैनिक रुपेश पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्यदिव्य प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यात झालेल्या चुरशीच्या फायनल सामन्यात जीतूआई जिते संघ अंतिम विजेता ठरला तर जय गिरोबा जोहे संघ उपविजेता, खरोशी संघ तृतीय क्रमांक व कोप्रोली संघ चतुर्थ क्रमांक ठरला…. एक लाख रुपये पारितोषिक असलेली प्रकाशझोतातील सामने मनसैनिक रुपेश पाटील यांनी पेण येथे आयोजित केले होते…. सदर सामान्यांना रायगड, ठाणे व मुंबईतील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दाखविली…
बक्षीस वितरण सोहळ्यावेळी व्यासपीठावर नगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक निवृत्ती पाटील, आयोजक रुपेश पाटील, उद्योजक मुदू आखवारे, मधुकर पाटील, महिला नेत्या निकिता पाटील, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, आफ्रिन आखवारे, भगवान पाटील, अविनाश पाटील, हिरामण जेधे, विशाल गिरी, ओमकार कचर, अक्षर थळे आदी मान्यवर उपस्थित होते…
रुपेश पाटील आयोजित मनसे चषकाच्या सामन्यांत पेण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील 32 संघांनी उत्कृष्ठ खेळ करीत सामन्यात रंगत आणली… गेल्या 12 वर्षांपूर्वी प्रकाशझोतातील क्रिकेट सामने पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळविण्यात येत होते, मात्र काळांतराने ते बंद झाले… परंतु गेल्यावर्षी पासून रुपेश पाटील यांनी हिम्मत दाखवीत उत्कृष्ठ आयोजन करत सदर नाईट क्रिकेट सामने सुरू केले… अंतिम सामान्यांपर्यंत जीतूआई जिते संघ, जय गिरोबा जोहे संघ, खरोशी संघ व कोप्रोली संघाने उत्कृष्ठ खेळ करीत व इतर अनेक संघांना पराजित करत रंगत आणली… सदर नाईट सामन्यांचा थरार पेणकरांसह रायगडकरांना पाहायला मिळाला… भावी नगरसेविका आफ्रिन मुदू आखवारे यांनी सर्व खेळाडूंवर बक्षिसांची खैरात केली होती…
सदर सामान्यांना शिवसेना आमदार महेंद्र दळवी, मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे युवा नेते अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजप नेते वैकुंठ पाटील, जिप सदस्य प्रभाकर म्हात्रे, डी.बी पाटील, सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक संदीप, बागुल, राजू पिचिका, तालुका अध्यक्ष अंकुश म्हात्रे, सिद्धू म्हात्रे, साईनाथ धुळे, भावेश बेलोसे, राजा म्हात्रे, छाया शिंदे, सुदेश संसारे, ऋषी कोळी, अनिल डाकी, अभिनेत्री रिया पाटील, आदिती पाटील आदींनी भेट दिली… तर सामन्यांचे निवेदन रोशन पाटील (तारा), सुभाष टेंबे, अक्षय पाटील, परमेश पाटील यांनी केले…
सामने यशस्वी पूर्ण करण्यासाठी रुपेश पाटील यांच्या सोबत निकिता पाटील, हिरामण जेधे, विशाल गिरी, अक्षर थळे ओमकार कचरे, सर्वेश पाटील, आशिष पाटील आदींसह मनसैनिकांनी विशेष मेहनत घेतली…