नॅशनल फिश वर्कर्स फोरमची आलीबागेत कार्यशाळा… मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह…

0
160

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आयोजित राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळा अलिबाग येथे सुरु झाली. पर्सनेट आणि एल इ डी मासेमारीमुळे मच्छीमारांचे प्रश्न निर्माण होत आहेत. देशभरात नव्याने होत असलेली विकसित बंदरे यामुळे दिवसेंदिवस मासेमारी व्यवसाय करणे कठीण झाले आहे. मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह या कार्यशाळेत करण्यात येत आहे. देशातील नऊ राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ  कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, सचिव उल्हास वाटकरे,  उपस्थित होते. १६ फेब्रुवारी रोजी नवगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.