अलिबागच्या शिक्षकाने अटल सेतूवरून मारली उडी… पोलिसांकडून शिक्षक वैभव पिंगळे यांचा शोध सुरु… 

0
49

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-   

प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईत अटल सेतू तयार करण्यात आला आहे. सेतूवर अपघातासह आत्महत्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अटल सेतूवरून एका ५० वर्षीय शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वैभव पिंगळे असे शिक्षकाचे नाव आहे. सकाळी वैभव चारचाकीवरून अटल सेतूवरून जात होते. मध्येच त्यांनी गाडी थांबवून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पोलीस वैभव इंगळे यांचा शोध घेत आहे.अटल सेतूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वैभव इंगळे असे ५० वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डस येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी का आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.वैभव इंगळे आपल्या कारने सकाळी अटल सेतूवरून जात होते. अटल सेतूवरून जात असताना त्यांनी आपली कार थांबवली. कार थांबवल्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच वैभव यांचा शोध पोलीस घेत आहे.२०२४ सालीही असाच एक आत्महत्येचा प्रकार घडला होता. मुंबईवरून नवी मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यावर अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला. त्या ५६ वर्षीय महिलेला पोलिसांना यश आलं आहे. मी आत्महत्या करत नव्हते तर, देवांचे फोटो समुद्रात सोडत होते. असे त्या महिलेने सांगितले.