मुंबईतील कुर्ल्यात FMRAI चे 27 वे अखिल भारतीय अधिवेशन… अध्यक्ष रमेश सुंदर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन… 

0
31

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

मुंबई कुर्ला येथील बंटर भवनच्या सभागृहात फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन ऑफ इंडिया (FMRAI )च्या 27 व्या अखिल भारतीय अधिवेशनचे उदघाटन करण्यात आले.15 फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसीय होणाऱ्या या अधिवेशनचे उदघाटन FMRAI चे अध्यक्ष कॉ. रमेश सुंदर यांच्या हस्ते संघटनेचे ध्वज फडकवून आणि हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून करण्यात आले.या अधिवेशनच्या उदघाटन सत्राचे स्वागताअध्यक्ष ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगीस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जगन्नाथ आप्पाजी शिंदे हे आहेत.श्री. जगन्नाथ शिंदे यांनी मान्यवर आणि अतिथी यांचे स्वागत भाषणात मुंबई आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक आणि ऐतिहासिक योगदानबद्दल महत्वाची माहिती दिली तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत कामगारांच्या संघर्षाचे महत्व अधोरेखित केले.सध्याच्या परिस्थितीमध्ये औषधं आणि आरोग्य क्षेत्रातील समस्या व आरोग्य यांच्या उल्लेख करताना त्यांनी देशभरातील वैद्यकीय प्रतिनिधी, डॉक्टर,केमिस्ट यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन संघर्ष उभारण्याचे आवाहन केले तसेच तीन दिवसीय अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.

मुंबईतील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ.संजय नगराळ यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात वैद्यकीय आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील संस्थांनाचे खाजगीकरण गेली वीस वर्षातील झालेला बदल आणि त्यांचा सर्वसामान्य जनतेवर झालेला परिणाम यावर सविस्तर मांडणी केली, कोरपो्रेट हस्तक्षेपामुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या आवाकाबाहेर गेल्याचे सांगून आरोग्य विभागाच्या वाढत्या गरजा, औषधीच्या वाढती किंमती,सरकारी धोरणवरील अल्प प्राधान्य या वीषयी चिंता व्यक्त केली…तसेच सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अधिवेशनास उपस्थिती दर्शवून सर्व उपस्थितांना संबोधित केले.उदघाटन सत्राचा समारोप MSMRA चे महासचिव श्रीकांत फोपसे यांनी केला.

FMARI चे अध्यक्ष कॉ.रमेश सुंदर,ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगीस्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जगन्नाथ आप्पाजी शिंदे,सुप्रसिद्ध पोटविकार डॉ. संजय नगराळ,ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे,CITU चे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख,AITUC चे राष्ट्रीय सचिव कॉ. सुकुमार दामले,मुंबई विद्यापीठाचे शिक्षक संघटनेचे कॉ.तपोनि मुखोपाध्याय,बॉंबे युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन चे कॉ. मधू परांजपे,ऍड.अरविंद तपोले,CITU महाराष्ट्र राज्य शाखेचे खजिनदार के. रघु,CITU मुंबई शाखेचे अध्यक्ष कॉ. के. नारायण,CITU चे मुंबई महासचिव कॉ. वर्तक,महासचिव शंतनु चटर्जी,फेडरेशन मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटे टिव्हज असोसिएशन चे अध्यक्ष कॉ. नरेंद्र सिंग,महासचिव श्रीकांत फोपसे,तसेंच पदाधिकारी आणि देशभरातील जवळपास 1000 पदाधिकारी उपस्थित होते.