गणेश नगर येथील महिलांचा सामाजिक पुढाकार… गणेश प्रवेशद्वाराजवळचा पडलेला मोठा खड्डा स्वतः बुजवला…

0
32

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर प्रवेशद्वाराजवळ सरकार मिसळ परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला होता. या खड्ड्यामुळे अनेक वाहने आदळून पडत होती, तसेच वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते…सततच्या तक्रारी असूनही संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने गणेशनगर येथील दोन महिलांनी हा खड्डा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला..सरिता पालांडे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी पुढाकार घेत आपल्या प्रयत्नांतून हा खड्डा मुरूम व माती टाकून बुजवला. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे…स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने लक्ष द्यावे आणि असे खड्डे वेळेत भरावेत, अशी मागणी केली आहे…गणेशनगर येथील महिलांनी दाखवलेल्या सामाजिक भानाचे आणि प्रयत्नशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे…