रखरखत्या उन्हात 70 निरंकारी अनुयायांनी केले उत्स्फूर्त रक्तदान…मुंबईच्या नाडकर्णी पार्क सत्संग भवन वडाला येथे शिबिराचे आयोजन…

0
120

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने मुंबईच्या नाडकर्णी पार्क सत्संग भवन वडाला पूर्व येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये 70 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला…रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिले पाहिजे’ हि बाबा हरदेव सिंह जी महाराज यांची शिकवण लक्षात घेत निरंकारी मिशनच्या विद्यमान सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मागर्दशनाखाली वर्षभर विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे…

नाडकर्णी पार्क सत्संग भवन वडाला पूर्व येथली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…यामध्ये विभागातील निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले…यावेळी रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी ब्लड बँकने केले…रक्तदान शिबिराचे नियोजन नाडकर्णी पार्क सत्संग भवन वडाला पूर्व चे मुखी रमाशंकर जैसवाल जी यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहकार्याने केले.