चिपळूण शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ) :-
चिपळूणमध्ये नुकताच अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल समोरील मैदानावर आयोजित कार्यक्रमात जगत् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांना मराठा समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले…
यावेळी “गणी गण गणात बोते” या जगत् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मंत्र उद्घोषांने आसमंत दुमदुमून गेला होता… छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आज हिंदू धर्म अबाधित आहे, म्हणून सर्वांनी हिंदूधर्मासाठी जगावे, एकत्र यावे असे प्रतिपादन केले…. पुरस्कार स्वीकारताना नरेंद्राचार्य म्हणाले की, माझ्या विचारांवर प्रेम करणाऱ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो आहे… पुढे ते आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या” या विचाराने मी काम करतो…
यावेळी दै. रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हास घोसाळकर, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण सामंत, सदाशिवराव भोसले, प्रकाशही देशमुख, कोकरे महाराज, विनोद चाळके यांना “मराठा समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले… तर यावेळी योगिता खाडे यांना क्रिडा पुरस्कार व हरिशदादा सावंत यांना क्रिडा क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला… छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील गुणवत्तांचा सन्मान करत सर्व जाती-धर्मांचा आदर करणारा मराठा समाज आहे… मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला बळकटी आणणारा उपक्रम असे सर्वानुमते अधोरेखीत करण्यात आले…