पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय पेट्रोलियम व गॅस नियमाक मंडळाचे (केंद्र सरकार) चेअरमन, खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे व माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदिती महोत्सवचा जल्लोष… नारी-शक्तीचा महोत्सव रविवार, दि. १६/२/२०२५ रोजी सायंकाळी पेण नगरपालिका मैदान येथे संपन्न झाला… कार्यक्रमाचे खास आकर्षण होते… लग्नाची बेडी फेम अभिनेत्री सायली देवधरची उपस्थिती, यावेळी तालुका व शहरातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या… पेण शहर राष्ट्रवादी युवा-काँग्रेस अध्यक्षा मुस्कान झटाम यांनी केले…
पेण शहर व पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पाडला जातो… हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असते… हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असते. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते… पैठणीचा खेळ, नृत्य व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात… यावर्षी देखील महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यात आले होते, तसेच दहा पैठणी, विजेत्याना लकी-ड्रॉ ने देण्यात आल्या…