तानाजी मालुसरे यांचा ३५५ वा शौर्य दिन व पुण्यतिथी कार्यक्रम… विविध शिवकालीन, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

0
26

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उंबरठ येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा ३५५ वा शौर्य दिन व पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला…. रायगड जिल्हा परिषद व उंबरठ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शिवकालीन व वैचारिक कार्यक्रमांनी हा कार्यक्रम पार पडला… पुण्यतिथी निमित्त समाधी स्थळ फुलांनी सजविण्यात आले होते….  यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांचे शौर्य कथन केले… यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे उपस्थित होते….  पुण्यतिथी निमित्त उंबरठ येथे सलग दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते….