अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
ग्रामीण भागातील गरीब, गरजू मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, म्हणून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजारहून अधिक सायकल वाटप करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील शाळकरी मुलींना शुक्रवारी (दि.21) सायंकाळी सायकल भेट देण्यात आली… स्व. प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्याने मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला…
स्व. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील व अॅड. दत्ता पाटील यांनी त्याकाळी ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केली… त्यांचा हा वारसा जपण्याचे काम शेकाप सरचिटणीस जयंत पाटील करीत आहेत. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांनीदेखील शिक्षणाला महत्व देत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे… गावे, वाड्यांमधील मुलींना शाळेत जाण्यासाठी साधने नसल्याने त्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते… हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला… गावे, वाड्यांमधील शाळकरी मुलींसाठी सायकली देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्यांनी केले आहे… सायकलीतून मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला…