शिवसत्ता टाइम्स प्रथमेश बारे सह प्रसाद बारे (श्रीवर्धन, कोलमांडले)
श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून असं सांगण्यात येत आहे कि, आज दुपारी १२:३० या वेळेस माणगाव येथून देवी-देवतांच्या जुन्या मुर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी हरिहरेश्वर येथे आली होती… ही महिंद्रा पिकअप विसर्जन करून बाहेर निघताना वाळूत रुतली… सुरवातीला चालकाने वाळूतून आपले वाहन बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र भरती असल्याने व टेम्पो पूर्णपणे पाण्यात अडकल्याने ते शक्य झाले नाही… नंतर तेथील स्थानिक नागरिक धीरज बोरकर, सार्थक मयेकर, रुपेश मयेकर, अमर कवडे इत्यादींच्या मदतीने भर समुद्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले मात्र समुद्राला भरती आणि उधाण असल्याने आणि महिंद्रा पिकअप ओल्या वाळूत पूर्णपणे फसल्याने प्रयत्न असफल झाले…