२४ तास कर्तव्यावर असणाऱ्या शासकिय अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी…

0
40

चौक शिवसत्ता (अर्जुन कदम) :-

२४ तास आपल्या जीवाची आणि आरोग्याची काळजी न करणारे आणि शासनाच्या कर्तव्यावर असणाऱ्या शासकिय अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी खालापूर न्यायालयात करण्यात आली…. लायन्स क्लब खालापूर, खालापूर न्यायालय वकील संघटना, वकील मित्र व न्यायालय कर्मचारी यांच्या विशेष सहकाऱ्याने पोलीस, न्यायालय कर्मचारी, अधिकारी, वकील, शासकिय अधिकारी कर्मचारी यांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर नायर हॉस्पिटल मुंबई व अपोलो हॉस्पिटल यांच्या विशेष सहकाऱ्याने व वतीने राबविण्यात आली… या शिबिराचे उद्घाटन न्यायाधीश खंदारे केले….

शासकीय यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना स्वतःची आरोग्य तपासणी करण्यास वेळ मिळत नाही, या उपक्रमाने त्यांची आरोग्य तपासणी होत आहे, ही बाब आनंदाची आहे, असे त्यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले… यावेळी खालापूर न्यायालय न्यायाधीश महोदय, सर्व वकील वर्ग, न्यायालय कर्मचारी,अधिकारी यांच्या बरोबर लायन्स शिवानी जंगम,लहू भोईर,किशोर पाटील, हरिभाऊ जाधव, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.सतीश पवार, वकील बार संघटना पदाधिकारी उपस्थित होते… सदर शिबिरात १५० हून जास्त वकील, मित्र, पोलीस ,कर्मचारी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. क्रियाशील लायन लहू भोईर यांनी विशेष मेहनत घेतली….