खांदाड तलाव भागात मगरींचा पुन्हा वाढला सुळसूळाट… अंधारात मगरी न दिसल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण…

0
21

माणगाव शिवसत्ता (नरेश पाटील):-

ऐन उन्हाळ्यात खांदाड येथील तलाव परिसरात मगरींचा सुळसूळाट  मोठया प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे… या मगरी विशेष करुन अंधार पडताच या तलावाच्या काठावर येतात…. या भागातून पादचारी ये-जा करत असताना अचानक तलावात उडी घेत आपल्या अस्तित्वाची जणू स्थानिकांना जाणीवच करून देत असतात…  विशेष करून सायंकाळी उशिरा ०८ ते १०:३० च्या दरम्यान या मगरींचा सुळसूळाट विशेष दिसून येतो…

रविवार दि. ०२ मार्च, २०२५ रोजी रात्री ०८:५५ च्या सुमारास तीन मगरी वस्तीच्या विरुद्ध दिशेने वालेराव साहेब निवासाजवळील असलेल्या मोरीकडे जाताना दिसल्या तसेच तीन ते चार मध्यम आकाराच्या मगरी डबक्यात उडी मारून गेल्या… त्याचवेळी आमच्या प्रतिनिधींनाही या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास आल्या…

मोरी जवळ काठाच्या भागात असलेल्या चिखलात दिवसा निद्रिस्त अवस्थेत या मगरी सर्रास पहावयास मिळतात… मगरींचा रंग आणि चिखलाचा रंग जवळजवळ सारखाच असल्याने या मगरी सहसा दिसत नसल्याने त्या अचानक समोर आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते…  त्याचप्रमाणे माणसांच्या बोलण्याचा आवाज ऐकताच मगरी  पाण्यात उडी मारतात…

याच भागातील अनेक भटके कुत्रे या ठिकाणी बसलेले असतात… रात्री ११:३० च्या सुमारास काठावर तसेच रस्त्यावर मगरी फिरत असल्याचे पाहून कुत्रे भुंकू लागल्याचा आवाज सतत नागरिकांना येत असतो… गेल्या वर्षी फॉरेस्ट खात्याने या भागात तालावाच्या उत्तरेला हिरवी जाळी बांधली होती, जी आजही मजबूत स्थितीत आहे… त्यामुळे त्या भागात मगरी येण्याच्या बंद झाल्या… मात्र आता याच मगरींनी आपला मोर्चा पश्चिम भागात वळवला आहे… माणगाव नगर पंचायत तसेच फॉरेस्ट  विभागाने यात लक्ष घालून या सर्व मगरींचा बंदोबस्त करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा एखाद्या दिवशी पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना धोखा निर्माण होऊ शकतो…

याबाबत आपल्या प्रतिनिधींनी रविवार दि. ०२ फेब्रुवारी रोजी रात्री ०९ वाजता व्हाट्सअपद्वारे फॉरेस्ट खात्याला तात्काळ माहिती दिली… या मेसेजला दाद देत  फॉरेस्ट खात्याने सकाळी भेट देणार असल्याचे सांगितले…