किहीम समुद्र किना-यावर दुर्मीळ ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादिने केले घरटे…

0
41

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-   

अलिबाग जवळच्या किहीम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले या दुर्मीळ होत चाललेल्या कासवाच्या प्रजातीच्या मादिने मंगळवारी दुपारी भरतीच्यावेळी किना-यावर येवून घरटे करुन तब्बल १५० अंडी घालून मादी समुद्रात परतली असल्याची माहीती समजते तब्बल ४० वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने किहीम समुद्र किनारी घरटे करुन अंडी घातली असल्याची माहिती येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे. परिणामी किहीम समुद्र किनार्यावरील सुरक्षिततेवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने या निमित्ताने शिक्कामोर्तब केले आहे.
ही माहीती किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिट्या गायकवाड यांनी दिली.