हेमनगर येथे शिवजयंती निमित्त शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याचे आयोजन…

0
26

रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

तिथीप्रमाणे १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रविण नंदकुमार देशमुख लिखित “शिवशंभू शौर्यगाथा” एक महानाट्य व शिवजयंती या कार्यक्रमाची रुपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रविण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थित एक पत्रकार परिषद घेण्यात आली… यावेळी येत्या तिथीप्रमाणे शिवजयंतीला शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केणी यांच्या कडून अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे…. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ आदि कार्यक्रमात शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार असल्याची माहिती देण्यात आली…