रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाड्यात वणव्याचा तांडव… धनगरवाडीतील भीषण वणव्यात 48 घरे जळून खाक…

0
23

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रोहा तालुक्यातील धामणसई येथील इंदरदेव धनगरवाड्यात लागलेल्या भीषण वणव्याने 48 घरे जळून खाक झाली आहेत… सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे… आग लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड आणि एस.व्ही. आर. एस बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत… आग वीजवण्यात स्थानिक ग्रामस्थही बचाव कार्यात मदत करत आहेत… आग वीजवण्यात यश आले असून वणवा लागण्याचे कारण अस्पष्ट आहे… उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज स्थानिकांडून व्यक्त केला जात आहे…