आमदार महेंद्र थोरवेंच्या जहरी टिकेनंतर रोह्यात राष्ट्रवादी आक्रमक… कार्यकर्त्यांकडून प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध…

0
44

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-  

रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष केले आहे. सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत, असं खळबळजनक विधान थोरवे यांनी केले आहे.सुनिल तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिल्याने रायगडातील अजित पवार गट राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झालीय…रोहा नगरपरिषद चौकात अलिबागच्या कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करीत निषेध दर्शवला…

यावेळी राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांकडून थोरवे यांच्या प्रतिकृती पुतळ्याला जोडे मारून निषेध  केला व त्यानंतर थोरवेंच्या पुतळ्याला चपलीचा हार घालून घोषणाबाजी केली…कार्यकर्त्यांनी तटकर साहेब अंगार हे बाकी सब भंगार घोषणा देऊन परिसर दणाणून काढला…महेंद्र थोरवेच्या बैलाचा…नीम का पत्ता कडवा है… अशा अनेक घोषणा देत निषेध केला…पोलिसांनी हस्तक्षेप करून बनवलेल्या पुतळ्याला ताब्यात घेतले…