बिरवाडी दुधाने आवड येथील घराला भीषण आग… आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक.. मोठ्या प्रमाणात नुकसान…

0
20

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाने आवड येथील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे… या आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी मात्र झाली नाही… सुरेश कोंडीबा अंधारे यांच्या मालकीचे घर पूर्णपणे या आगीमध्ये जळून खाक झाले आहे… घरामध्ये असलेले सिलेंडर टाकीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने या दोन्ही सिलेंडर टाक्यांचा स्फोट झाला नाही… घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, अग्निशामक दल दाखल झाले असून आज विझवण्यात आली आहे… मात्र गरीब कुटुंबातील असलेले अंधारे यांच्या घराचे आणि घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल आहे… लवकरात लवकर पंचनामा करून अंधारे यांना मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे…