भैय्या जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याबाबत निदर्शने… पेणच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून पेण पालिका नाक्यावर निषेध…

0
16

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):- 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्या जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पेणच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून पेण पालिका नाक्यावर निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, जिल्हा सह समन्वयक समीर म्हात्रे, विनोद म्हात्रे, जगदीश ठाकूर, शहर प्रमुख सुहास पाटील, महिला शहर प्रमुख मेघना चव्हाण, हिराजी चोगले, तुकाराम म्हात्रे, महेश पोरे, योगेश पाटील, वैशाली समेळ, राजश्री घरत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मुंबईमध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भैय्या जोशी यांच्या या वक्तव्याचा आज पेण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद भोईर यांनी सांगितले की, ही जी काही वक्तव्य होत आहेत ती सत्ताधारी जाणूनबुजून घडवून आणत आहेत. हा खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा अपमान आहे. मात्र सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न राज्यातील मराठी भाषिक आणि बाळासाहेबांचे हे शिवसैनिक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. राज्य शासनाच्या एकाधिकार शाहीचा आणि भैय्या जोशीच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलो आहोत. शिवाय या भैय्या जोशीसह प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अबू आझमी यांची तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी आमदारकी रद्द करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे.