पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
पेण तालुक्यातील मौजे-कोप्रोली गावातील प्राचीन काळातील भवानी मातेच्या मंदिराचे जिणोध्दाराचे काम ग्रामस्थांनी एकमताने योजिले असून, त्याचा भूमिपूजन सोहळा युवानेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते व ऍड. विकास म्हात्रे, नरेन्द्र ठाकूर, दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला…. यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते….
आई भवानी माता ही कोप्रोली गावची ग्रामदेवता असून, तिचा इतिहास पाहता देवीची स्थापना हि १४ व्या शतकातील बहमनी साम्राज्यातील आहे…. त्या बाबतचे दस्तावेज गावातील गुरव (भोपी) यांच्याकडे आजही उपलब्ध आहे…. २० सप्टेंबर १८०७ साली मुंबई इलाख्याचे (राज्याचे) गव्हर्नर राईट अनरेबल उईलियम रॉबर्ट सिमोर वेसी फिट झेरॉल्ड साहेब बहादूर यांच्या सहीनिशी सनद देण्यात आली आहे… “श्री सिद्धेश्वर व भवानी माता मंदिराचे वहिवाटदार जोपर्यंत इंग्रज सरकारशी इमाने इतबारे वागतील तोपर्यंत सदरहू संस्थानास दाखल रूपये ०३ इतकी रक्कम निरंतर देण्यात येईल.” असे त्यावेळी देण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे….
या ऐतिहासिक प्राचीन मंदीराचा १४ व्या शतकापासून आजपर्यंत ७०० वर्षे जुना इतिहास असून, आई भवानी माता ही कोप्रोली पंचक्रोशीतील नवसाला पावणारी व तमाम जनतेच्या श्रध्देचे स्थान आहे…. सदर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अंदाजे ५० ते ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे… तरी मंदिराच्या जिणोध्दारास सर्व स्तरातील दानशुर व्यक्तिनी सढळ हस्ते आर्थिक व वस्तु रूपाने सहकार्य करावे, असे आवाहन जीर्णोद्धार कमिटीने केले आहे….