लायन्स क्लब आणि माधवभागचा अनोखा उपक्रम… नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत तपासणी…  

0
33

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब आणि माधवभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर ७ व ८ मार्च २०२५ रोजी संपन्न झाले असून आगरवाल वाडी, बापूजीदेव प्रवेशद्वाराजवळ, सारच येथे आयोजित करण्यात आले होते.शुक्रवार, ७ मार्च २०२५ – सकाळी ८:०० ते सायंकाळी ८:०० व शनिवार, ८ मार्च २०२५ – सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत घेण्यात आले…

या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषत: रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, डोळ्यांची तपासणी, हाडांची मजबुती, हिमोग्लोबिन स्तर मोजणी आणि इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या अनुभवी डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते…व  आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली. नियमित आरोग्य तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांचे निदान लवकर करता येते व योग्य वेळी उपचार घेता येतात.

शिबिरात आरोग्य तज्ज्ञांकडून आहार, जीवनशैली आणि नियमित व्यायामाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले गेले. तसेच काही निवडक तपासणीसाठी आवश्यक असलेले औषधोपचारही मोफत दिले गेले…
सर्व नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली… “आरोग्य हीच खरी संपत्ती” या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते….