अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास परिवर्तन आघाडी, मापगाव आणि जागतिक महिला दिन समिती, मापगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता… यामध्ये बक्षीसांची व भेटवस्तूची खैरात ग्रामविकास परिवर्तन आघाडीतर्फे करण्यात आली… कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या… मापगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावाकरिता वेगवेगळे सात लकी ड्रॉ काढण्यात आले… त्यामध्ये भाग्यवान विजेत्या महिलेस मिक्सर बक्षीस देण्यात आले.तसेच एक मुख्य लकी ड्रॉ काढण्यात आला… त्यामध्ये दोन लकी ड्रॉ काढण्यात आले… अनुक्रमे पहिल्या लकी ड्रॉमध्ये एक ग्रॅम सोन्याचे नाणे व दुसऱ्या लकी ड्रॉमध्ये सोन्याची नथ बक्षीस देण्यात आले… महिला दिनाचे औचित्य साधून डि महेश (मुंबई)यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम मुख्य सुत्रसंचलन केले… यामध्ये एक ते सात क्रमांक काढण्यात आले… त्यांना अत्याधुनिक गॅस शेगडी, रिमोट पंखा,टॉवर पंखा,व ट्रॅव्हल बॅग हि बक्षिसे देण्यात आली… प्रथम क्रमांकास रेफ्रिजिरेटर, दुसऱ्या क्रमांकास वॉशिंग मशीन व तिसऱ्या क्रमांकास वॉटर प्युरिफायर देण्यात आले…