महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडच्या वतीने दिनांक १० मार्च २०२५ रोजी जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर शेठ यांच्या निवासस्थानी शोभिवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते… या सोहळ्यात शाखेतील सर्व सन्माननीय महिलांचा गौरव करण्यात आला…. सुरुवातीस शाखाध्यक्ष श्री. गंगाधर शंकर साळवी यांनी प्रास्ताविकाने सोहळ्याची सुरुवात केली…. महिला दिनाविषयी व महिलांच्या गौरवार्थ सुंदर भाष्य केले… १० मार्च हा भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन तसेच ज्येष्ठ कवी गीतकार मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन… या निमित्ताने त्यांना सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले… त्यानंतर को.म.सा.प.रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री सुधीर शेठ यांनी कर्तुत्ववान महिलांची व्यावसायिक कौटुंबिक कसरत, कुटुंबासाठी चंदनाप्रमाणे झीजणाऱ्या स्त्रीचा सन्मान त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला… स्त्रीविषयी तिच्या कौटुंबिक नात्याविषयीची एक सुंदर दीर्घ कविता त्यांनी सादर केली व सर्व महिलांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…. श्री. सुधीर सकपाळ सरांनी स्त्री ही केवळ स्त्री नसून संसारात इंजिनियर, डॉक्टर आशा सगळ्या भूमिका कशा पार पाडते, याचे उत्तम सादरीकरण कवितेतून केले…. जिल्हा समन्वयक मा.श्री. अ.वि. जंगम सर यांनी नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या विषयावर सुंदर मनोगत व्यक्त केले…. स्त्रिया संवेदनशील, हळव्या असतातच परंतु प्रसंगी त्या कशा पोलादी असतात, कशा प्रकारे कुटुंब सावरतात हेही सांगितले… यावेळी त्यांनी स्वतःच्या पत्नीविषयी सन्मानाने केलेल्या लिखाणाचे सादरीकरण केले…. शाखा सचिव श्री. दीपक सकपाळ यांनी ‘बाई पण तुला कधी कळणार गड्या…बाई शिवाय तुझं पानही हलत नाही’… अशी अतिशय दमदार कविता सादर केली व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…. त्यानंतर न भूतो असा प्रत्येक महिला सदस्यांचा हृदयपूर्वक सन्मान करण्यात आला….
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यापूर्वी श्री गंगाधर साळवी सर यांनी त्यांच्या अमाप शब्द संपत्तीचा वापर करून प्रत्येक सन्माननीय महिलेच्या गुणवैशिष्ट्यांचा सन्मान केला… त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती विषयी खूप छान भावना व्यक्त केल्या…. यावेळी आदरणीय शोभाताई सावंत यांच्याविषयी फार सुंदर कवितेच्या ओळी सादर केल्या, त्यामुळे या सन्मान सोहळ्याची रंगत अजूनच वाढली व प्रत्येकाला भरून आले… प्रत्येक महिला सदस्यांना प्लॅटफॉर्मवर उभं करून कवी श्री. दिलीप पाटील लिखित सुंदर कविता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले…. यानंतर महिलांच्या वतीने शाखेच्या माजी अध्यक्षा सौ. स्नेहा गांधी यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले… पुरुषांशिवाय आमचा महिला दिन अपूर्ण आहे… पुरुषांचा पाठिंबा आहे, म्हणून आम्ही प्रगती करू शकतो, असे त्या यावेळी म्हणाल्या… तसेच पुरुषांनी केलेल्या आयोजनाबद्दल त्यांना हृदयपूर्वक सलाम केला… त्यानंतर महाड शाखा युवा अध्यक्षा सौ.संध्या पोटफोडे यांनी संवेदनशील मनोगत व्यक्त केले… त्यानंतर शाखा सदस्या, कवयित्री व माजी नगरसेविका सौ. पद्मा शीपुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना धन्यवाद दिले… त्यानंतर शाखेच्या माजी अध्यक्षा सौ.नीता शेठ यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले… त्यानंतर प्रा.सौ स्नेहा काळे यांनी स्त्री जीवनाविषयीच्या कवितेचे सादरीकरण केले…. सदस्या सौ. प्रतीक्षा नगरकर यांनी १० मार्च हा कविवर्य आदरणीय मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस म्हणून त्यांच्याच एका कवितेचे सादरीकरण केले व त्यानंतर स्वरचित स्त्री जीवनावरील कवितेचे सादरीकरण केले… त्यानंतर सुधीर शेठ यांनी सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद दिले…. अल्पोपहार व थंडगार लिंबू सरबताने कार्यक्रमाची लज्जत वाढली…. आदरणीय शोभाताई सावंत, संगीता कुलकर्णी, मंगल मेहता, ज्योती शेठ मॅडम, सौ.प्रिया शहा, सौ. रश्मी जंगम, सौ. मुग्धा सागवेकर, शमा पाटील, सौ. गायत्री करमरकर, सौ. कांचन शेठ यांची तसेच सहसचिव योगेश देवघरकर, श्री. उमेश मिंडे, उदय दळवी या पुरुष सदस्यांची विशेष उपस्थिती ही सर्वांना प्रेरणादायी ठरली… अतिशय सुंदर स्त्री गौरव सोहळा केल्याबद्दल समस्त स्त्री वर्ग आपल्या ऋणात आहोत, आमच्या आयुष्यातील सोनेरी अविस्मरणीय क्षणांमध्ये या सोहळ्याची नोंद झाली आहे, आशा उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या… महाराष्ट्राच्या ज्येष्ठ गझलकारा सौ.ज्योत्स्ना राजपूत मॅडम यांच्या गझल आणि कवितांनी सजलेला बॅकस्टेज बॅनरने कार्यक्रमाची अधिकच शोभा वाढवत होता…