इसांबे पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीने परिसरातील जनतेला दिलासा… 

0
54

चौक  शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :- 

इसांबे पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीने परिसरातील जनतेला व कारखानदार यांना मोठा दिलासा मिळाला असून, येथील पोलीस यंत्रणा चोवीस तास सतर्क राहून जनतेच्या अडचणींचे निवारण होणार आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण प्रदेश संजय दराडे यांनी केले आहे…

खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत इसांबे येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते…. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते… खालापूर येथे पोलीस ठाणे असले तरी इसांबे हा परिसर साधारण तीन कि.मी. अंतरावर आहे… हा परिसर नागरिक वसाहत, आदिवासी बहुल, दुर्गम आणि औद्योगिक वसाहतीचा असला तरी दळण वळण साधन म्हणावे तसे उपलब्ध नाही…. त्यामुळे तक्रारदार यांना खालापूर येथे येण्यास उशीर होत असे…  याची दखल या परिसरातील नागरिक, कारखानदार व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली… यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पवार, महसूल विभाग यांच्या संयुक्त बैठकीत इसांबे येथे पोलीस मदत केंद्र उभे करण्याचे निश्चित झाले आणि फक्त एकवीस दिवसात या केंद्राची उभारणी केल्याने पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी येथील पोलीस अधिकारी यांचे विशेष कौतुक केले… या मदत केंद्राच्या कक्षात इसांबे, माजगाव, माडप व कुंभिवली या चार ग्रामपंचायत यांचा अंतर्भाव होत आहे…. एकूण आठ गावे आणि दहा वाड्या असून, ८०२७ एवढी लोकसंख्या आहे….

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सात कि.मी. तर सावरोली, माडप, खारपाडा याचे दहा कि.मी. अंतर समाविष्ट आहे तसेच ५३ औद्योगिक लहान-मोठे कारखाने आहेत… या कारखानदारीत स्त्रिया, परगावीचे कामगार, ठेकेदार यांना सुरक्षितता वाटेल, पोलिसांची गस्त झाल्याने परिसर कार्यान्वित राहील अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली… यावेळी मदत केंद्राला मदत करणाऱ्या व्यक्ती, कारखानदार यांचा सन्मान करण्यात आला… उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक संजय बांगर, सरपंच, स्थानिक नागरिक, कारखानदार, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी सरपंच राजू मोरे, नितीन पाटील, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, चार पोलीस या ठिकाणी कायम असतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली…. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सचिन पवार, सूत्र संचालन जगदीश मार्गे तर आभार सपोनि. संतोष औटी यांनी केले.