रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाणं वाढत चालेले असतानाच रायगड जिल्ह्यातून एक बातमी हाती आली आहे… बातमीचा पाठपुरावा केल्यास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे… तसेच मारहाण केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. रेवदंडा पोलिस ठाण्या अंतर्गत कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे हे बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई करीत असताना मुरुड तालुक्यातील बोर्ली विभागातील दोन आरोपींनी धक्काबुक्की करून मारहाण करीत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेवदंडा पोलिस ठाण्यातून प्राप्त झालेली सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोर्ली ते साळाव तपासणी नाकादरम्यान आरोपी झीशान उलहक वसीम सातारकर याने त्याचा पिकअप टेम्पो वाहतुकीला अडथळा येईल अश्या पद्धतीने उभा केला होता. याची माहिती सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांना प्राप्त होताच ते घटनास्थळी गेले.सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांनी आरोपी झीशान उलहक वसीम सातारकर व सर्वेश सुनिल ठाकूर या दोघांना पिक अप टेम्पोसहित रेवदंडा पोलिस ठाण्यात आणले असता, त्यावेळी त्या दोघांनी फौजदार दिनेश पिंपळे यांच्याशी वाद घातला, तसेच अरेरावीची भाषा अशा काही अपशब्दांचा वापर देखील केला.
सहाय्यक फौजदार पिंपळे यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, त्यामुळे सांगिक कारवाई करीत असल्याचा राग आरोपी झीशान उलहक वसीम सातारकर व सर्वेश सुनिल ठाकूर यांना अनावर झाला. दरम्यान फौजदार पिंपळे हे पिकअपमधून गाडीची कागदपत्रे आणण्यासाठी पोलिस स्टेशन इमारतीच्या बाहेर गेले… फौजदार पिंपळे हे शासकीय गणवेशामध्ये असून ते शासकीय कर्तव्य बजावत आहेत, याची माहिती असताना देखील आरोपी झीशान उलहक, वसीम सातारकर व सर्वेश ठाकूर यांनी त्यांचे शर्ट खेचून हाथाबुक्काने मारहाण केली.तसेच या हाथबुक्की व मारहाणीमूळे फौजदार पिंपळे यांना शारीरिक इजा मोठ्या प्रमाणात झाली, शिवाय फ़ौजदार यांच्या डाव्या हाताच्या पंजावर व उजव्या हाताच्या मनगटावर खरचटले आहे.तसेच फ़ौजदार पिंपळे यांच्या अंगावर असणाऱ्या शासकीय गणवेशावर असलेली नाव पट्टी,(नंबर प्लेट) व शर्टाची बटणे तोडली… शासकीय गणवेशात असताना व शासकीय कर्तव्य बजावत असताना, त्यांना कर्तव्य पार पाडण्या पासुन धाकाने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आरोपी झीशान उलहक, वसीम सातारकर व सर्वेश सुनिल ठाकूर यांच्यावर रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.28/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे 123, 121(1),324(2),3(5),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक दत्तू गांगुर्डे हे करीत आहेत.