अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यात होलिकोत्सवाची धूम सुरू झालीय. विशेषतः कोळीवाड्यांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळतो आहे. रात्री ठिकठिकाणच्या कोळीवाड्यात होळ्या सजवण्यात आल्या होत्या. मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे. महिलांनी सजून नटून होळीची मनोभावे पूजाअर्चा केली. नैवेद्य दाखवण्यात आला. महिला, पुरुष, लहान मुलं पारंपारिक वेशभूषा करून डीजेच्या तालावर नाचत होते. काही ठिकाणी देखावे साकारण्यात आले होते. यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पहायला मिळाली. कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.