जागतिक पर्यटन असलेले माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले… माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद अखेर मागे…

0
145

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे…आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शासन व प्रशासन यांच्या सहकार्याने सकारात्मक चर्चा झाली आणि यावर तोडगा काढण्यात आला… पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून, माथेरानमध्ये पर्यटकांचे स्वागत आहे! माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या बंद बाबत मा.आमदार महेंद्रशेठ थोरवे, मा. उपविभागीय अधिकारी कर्जत, मा.डी.वाय.एस.पी. कर्जत आणि स्थानिक प्रशासन यांनी आपल्या विविध मागण्याबाबत विस्तृतपणे चर्चा करून पुढील कार्यवाहीसाठी मा.अधीक्षक मा.मुख्याधिकारी मा. सहायक पोलीस निरीक्षक व मा. वनपाल माथेरान यांना अंमलबजावणीसाठी आदेश दिलेले आहेत… सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन उत्सु्फूर्त प्रतिसाद दिल्या त्याबद्दल तसेच आमदार महोदयांचे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले…