खालापूर येथे महिलांचा “स्त्रीत्वाचा गौरव सोहळा” सन्मान कार्यक्रम संपन्न…

0
72

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत वावोशी पोलीस दुरक्षेत्र आणि विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कुल यांच्या वतीने वावोशी फाटा येथे स्त्रीत्वाचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता… या गौरव सोहळ्यास खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला… या सन्मान सोहळ्यात अभिनय क्षेत्रातील अभिनेत्री तसेच स्टार प्रवाह वरील उदे ग अंबे फेम मयुरी कापडणे यांची विशेष उपस्थिती लाभली….

यावेळी खालापूर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या सरिता मनवर, खोपोली पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या पूजा चव्हाण, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या भक्ती साठेलकर, सामाजिक सेवा करणाऱ्या इशिका शेलार, मिस टुरिझम ग्लोब हर्षला तांबोळी, विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्या गिता म्हात्रे, महिला उद्योजिका प्रिया खोपकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला…. तसेच नंदनपाडा येथील बयाबाई रामभाऊ पाटील आणि वडवळ येथील नर्मदा गोपाळ चाळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले… या कार्यक्रमास छत्तीशी विभागातील ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच परीसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या… सदरचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वावोशी दुरक्षेत्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अलोक खिस्मतराव आणि कर्मचारी तसेच विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका यांनी मेहनत घेतली….