मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थातच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया…आज १ एप्रिल रोजी बॅंकेचा ९० वा स्थापना दिवस साजरा करणार आहे… या कार्यक्रमासाठी मुंबईत भारताच्या राष्ट्राध्यक्षा श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी आगमन झाले…
आगमनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन् यांनी त्यांचे स्वागत केले… श्रीमती द्रौपदी मुर्मू आजच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत…