मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
वाल्मिक कराड, सुर्दशन घुलेला मारहाण झाली नाही… अन्य कैदी सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात बाचाबाची झाली असे कारागृह अधिक्षक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण. महादेव गितेला हर्मूल जेलमध्ये हलविण्यात आले असून बबन गितेचा ‘द एन्ड’ केल्याशिवाय चप्पल घालणार नाही… असा वाल्मिकचा “पण” असल्याचे भाजप आ. सुरेश धस यांनी सांगितले आहे.
‘तुम तिलक हो हमारे माथे का..!’ जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या कथित महादेव गितेसाठी बबन गितेने फेस बुक पोस्ट केल्याची चर्चा आहे… सातशे गाड्यांच्या ताफ्यानिशी पवारांच्या राष्ट्रवादीत नऊ महिन्यांपासून फरार असून जेलमध्ये समर्थकांकडून वाल्मिक कराडला मारहाण… वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलीवूड इंडस्ट्रीत गुंतवला आहे ? फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचं कार्ड सापडल्याने संकेत… यावरून बीड पोलीसही चक्रावले आहेत… वाल्मिक कराडला तुरुंगात स्पेशल जेवण देण्यात येते… थेट परळीच्या हॉटलाईनच्या अॅक्सेसवरून आ. सुरेश धस यांचा मोठा दावा…
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी उभ्या केलेल्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला असून जागेवरच पोस्ट-मॉर्टम आणि अत्यंविधी पार पाडण्यात आला… हत्या झाल्याची चर्चा असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दावा आहे… वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप… मनोज जरांगेंच्या मनात याबाबत शंकेची पाल चुकचुकली… जरांगे म्हणाले, आरोपी सोंग करणारे असून, लोकांना चक्क वेड्यात काढण्याचा प्रकार करत आहेत…