पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
आई गावदेवी ओवळू माता यात्रे निमित्त छकड्यांच्या बिनजोड जंगी शर्यती आमदार हिंद केसरी पनवेल उरण व सरपंच हिंद केसरी ओवळे आयोजित बैलगाडा बिनजोड शर्यतीची सुरुवात गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या माध्यमातून तसेच ओवळे ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते…
या बैलगाडा शर्यतीसाठी अनेक बैलगाडा चालक-मालक शौकिनांनी सहभाग घेतला होता… यावेळी नंदराजमुंगाजी यांनी बोलताना सांगितले की, एक वेगळा इतिहास घडावा म्हणून पनवेल उरणचे आमदार म्हणून हिंद केसरी मैदानात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे… यामध्ये मोठ्या संख्येने बैलगाडा मालक हजर होणार आहेत आणि मोठमोठया बैलगाडा स्पर्धा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत, त्याचा आस्वाद सर्वांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास सहकार्य करावे असे त्यांनी बोलताना सांगितले… तसेच येणाऱ्या सर्व स्पर्धकांचे व प्रेक्षकांचे स्वागत त्यांनी यावेळी केले…

