काराव-गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनोहर पाटील…ग्रामपंचायतीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील:मनोहर पाटील…

0
42

पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल) :-

पेण तालुक्यातील काराव-गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे…काराव गडब ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक कोठेकर यांनी राजीनामा दिल्याने मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणुन सरपंच मानसी पाटील यांनी काम पाहीले यावेळी सरपंच मानसी पाटील सदस्य,सिता पाटील,भाग्यश्री कडु,दिपक कोठेकर,जगदीश कोठेकर , किर्ती म्हात्रे,मनोज म्हात्रे,दिनेश म्हात्रे,संध्या म्हात्रे,वैशाली म्हात्रे,परशुराम मोकल,मुक्ता वाघमारे ग्रामसेवक मछीद्र पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
काराव गडब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील समस्या सोडविण्यासाठी व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन…ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाला अधिकाधिक चालना देण्याचे काम आम्ही येत्या काळात करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच मनोहर पाटील यांनी सांगितले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांची काराव गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले…