पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल ) :-
श्रीराम क्रिकेट चिंचवली व ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांच्या नावाने डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे… या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले…
यावेळी युवा उद्योजक जय न्यू मोटर्सचे मालक संजय गवळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला… यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल शेतकरी कामगार पक्ष विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव गायकर आदी मान्यवर उपस्थित होते… यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले… यावेळी कार्यकर्त्यांनी संजय गवळी यांना वाढदिवसा निमित्त त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…