माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
शहरातील सिख बांधवातर्फे रामनवमी शोभायात्रेच्या दिनी भक्तांना लाडू आणि पिण्याच्या बिसलेरी पाण्याचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. रविवार दि.६ एप्रिल २०२५ रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला…या उत्सवाच्या निमित्ताने रामनवमी उत्सव कमिटीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये हजारो भक्त सहभागी झाले होते.
उत्सवाच्या दरम्यान, माणगाव सिख बांधवाकडून भक्तांना लाडू आणि पिण्याचे बिसलेरी पाणी बाटल्या वाटप करण्यात आले. हा उपक्रम माणगाव सिख सेवा सोसायटी आणि चॅरिझेन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पार पडला…चॅरिझेन फाउंडेशनचे माणगाव शाखा अध्यक्ष आणि माजी सैनिक दहा सिख रेजिमेंटचे कॅप्टन एन. एस. रांधवा यांनी या उपक्रमास विशेष उपस्थिती दिली…या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन माणगाव शीख सेवा सोसायटीचे प्रमुख सरदार सुरेंद्र सिंग बरमन यांच्या नेतृत्वात पार पडले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते गुरुविंदर सिंग सोढी यांच्या अमूल्य सेवे देखील यावेळी विशेष दिसून आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरेंद्र सिंग बरमन, अशोक सिंग पोतीवाल, सुरेंद्र सिंग भाटिया, गुरुविंदर सिंग भाटिया यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक सिख बांधव उपस्थित होते.सरदार सुरेंद्र सिंग बरमन यांनी सांगितले की, “आमच्या माणगाव सिख सेवा सोसायटीतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यंदा रामनवमी उत्सवाच्या वेळी प्रथमच आम्ही मोठ्या प्रमाणावर भक्तांना लाडू आणि पाणी वितरित केले. तसेच, मुंबई-गोवा प्रवासी आणि वाहनचालकांसाठी देखील पिण्याचे पाणी आणि लाडूचे वाटप करण्यात आले. आमच्या याच उपक्रमातून 2 हजारांहून अधिक राम भक्तांना लाडूचे प्रसाद वितरित करण्यात आले आणि लाभ घेतले, यामुळे आम्हाला विशेष आनंद झाला आहे.”
या कार्यक्रमाला माणगाव नगर पंचायतचे उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर मॅडम, युवा नेता सुमित काळे, चॅरिझन फौंडेशन उपाध्यक्ष सतीश काळे, विलास आठवले, अनिल कराड, विजयश्री कराड मॅडम, किशोर झेमसे, कमलेश विशवकर्मा आणि पूर्ण टीम उपस्थित होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, ज्यामुळे सिख बांधवांच्या सामाजिक कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे.