रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गावाच्या डोंगररांगेत बौद्ध संस्कृतीचं नवं दालन मिळाल आहे… MBCPR संस्थेने शोधली प्राचीन बुद्ध लेणी, ज्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आणि बौद्ध अनुयायांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे… या लेण्यामध्ये एक भिक्षुक निवास आहे… समोरील दर्शनी भाग, आतला आसन भाग याची मोजणी करण्यात आली असून विशेष म्हणजे येथे दोन शिलालेख सापडले आहेत… एका शिलालेखात ‘मल(सरी) गिरनं कोझकाने पुसादो’ आणि दुसऱ्यामध्ये ‘सिंहपभरो (क)’ अशी अक्षरं स्पष्ट दिसत आहेत…
गावकऱ्यांना ही लेणी पूर्वीपासून माहिती होती, मात्र पांडवकालीन समजुतीमुळे याकडे दुर्लक्ष झाले… गणेश केदारी आणि राकेश गायकवाड यांच्या पुढाकारामुळे MBCPR संस्थेने ३ नोव्हेंबर २०२४ रोजी या ठिकाणी पाहणी केली… ६ एप्रिल २०२५ रोजी सम्राट अशोक जयंतीनिमित्त येथे श्रमदान मोहीम राबवण्यात आली. झाड-झुडप काढणे, दगड हटवणे, समोरील जागा समतल करणे ही कामे महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या ४५ लेणीसंवर्धकांनी पार पाडली…
या लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी डोलवली स्थानकावरून बीड खुर्द गाव गाठावं लागतं. सारनाथ बुद्ध विहाराजवळून स्थानिकांच्या मदतीने डोंगर चढून लेणीपर्यंत जाता येते या लेणीचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संवर्धन झाल्यास खालापूर तालुक्याचं नाव देशभरात उजळू शकते… बौद्ध इतिहासाच्या नव्या पानाची सुरुवात आणि ती सुरू झाली आहे…रायगडच्या डोंगरात हा केवळ एक शोध नाही, तर संवर्धनाची आणि जागृतीची मोहीम आहे…अस म्हटले जात आहे…