दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
सध्या स्थानिक आमदार व मंत्री महोदयांची मतदारसंघातील भ्रमंती स्थानिकांना ऊर्जा देणारी व लक्षणीय ठरते आहे. दापोली तालुक्यातील वेळवी राम मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.योगेशदादा कदम यांनी भेट देऊन प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेतले. मंत्री महोदयांच्या आगमनाने जनमानसात नवचैतन्याची भावना निर्माण झाली आहे…
वेळवी राममंदिर उत्सव येथील रामवाडी आणि यादववाडीतील रामभक्त ग्रामस्थांच्यावतीने साजरा केला जातो… यावेळी मंत्री ना. योगेशदादा कदम यांनी उपस्थित ग्रामस्थांना रामनवमीच्या शुभेच्छा देऊन दोन्ही गटातील बांधवांनी एकत्र येऊन रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने एकोप्याने साजरा करण्यात यावा असे सांगितले… या भक्तीमय वातावरणात विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर भाई देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, माजी कृषी समितीच्या सभापती रेश्माताई झगडे, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी, सामाजिक कार्यकर्ते मधुकर दळवी, युवा सेनेचे सचिव राजेश झगडे, यादव वाडी ट्रस्टचे (ग्रामीण) अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष धोंडू चौगुले, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सुरेश तांबडे, प्रभाकर मिरगळ, मनीष चौगुले तसेच गावच्या पोलीस पाटील रेवा झगडे आदी उपस्थित होते… यावेळी यादव वाडी ट्रस्टच्या वतीने ना. योगेशदादा कदम व शिवसेनेचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला…
या उत्सवा दरम्यान दापोली पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता… सदरचा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडण्यासाठी दापोली पोलीस निरीक्षक श्री. अहिरे साहेब, उपनिरीक्षक यादव साहेब, बीट अमलदार मोरे साहेब यांचे विशेष लक्ष या उत्सवाकडे होते…