मोहपाडा वासांबे ग्रामपंचायतीला मिळाले आयएसओ ९००१ नामांकन… सरपंच,उपसरपंचसह सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सत्कार…

0
126

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची समजली जाणारी वासांबे (मोहपाडा) ग्रामपंचायतीला नुकताच आयएसओ ९००१ नामांकन मिळाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीला आयएसओ ९००१ नामांकन प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रसायन विभागाच्यावतीने मंगळवारी चांभारली येथील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहामध्ये सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता…

या सत्कार सोहळ्याला पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी,ज्येष्ठ नेते प्रमोद राईलकर,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी,माजी सरपंच संदीप शेठ मुंढे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष मुकुंदशेठ जांभळे,नामदेवशेठ कोकंबे,पांडूशेठ पारंगे,जयराम पाटील,संतोष मांडे,गणेश काळे, डॉक्टर चव्हाण,विल्यम मार्टीस,संजय कांबळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते…

यावेळी सरपंच उमाताई मुंढे व सर्व सन्माननीय सदस्यांच्या मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला…कार्यक्रमाची सुरुवात गणेश काळे यांच्या सुरेल आवाजात विठुरायाच्या गीताने करण्यात आली…कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास म्हात्रे यांनी केले…