गर्भवती तनीषा भिसेच्या मृत्यूने पुण्यनगरीत संतापाची लाट… बेजबाबदारींने वागणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर होणार कारवाई…

0
22

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

          पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजपचे आमदार अमित गोरे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनीशा भिसे यांचा मृत्यू  झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर भाजप ‌प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हलगर्जीपणा करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. रुग्णालयात मुघलशाहीप्रमाणे मुजोरी चालू आहे… याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप-मुख्यमंत्री यांनीही दखल घेतली आहे.

गर्भवती तनीषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे, कोणालाही अभय दिले जाणार नाही, असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.जिल्हाधिकारी यांच्यासोबत पुढे स्पष्ट केले आहे की, या रुग्णालयास अनेक सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत, पार्किंगकरीता देखील जागा देण्यात आली आहे, तरीपण डॉक्टर आणि कर्मचारी अशाप्रकारे मुघलशाही‌प्रमाणे वागत असतील,सर्वसामान्य नागरिकांस अशा प्रकारे उपचार न देणे ही एक प्रकारची मुजोरी आहे,अक्षम्य गुन्हा आहे हे खपवून घेतले जाणार नाही, गुन्हेगारांवर खटले भरण्यात येऊन कठोर कारवाई केली जाईल असे अधोरेखित केले.