पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
ग्रामपंचायत हद्दीतील घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव (वय-४८) यास नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार दि.११ एप्रिलला अटक केली…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे वकिल असून त्यांचे आशिल यांना कोर्टाचे कामकाजासाठी तसेच एम.एस.इ.बी. येथे सादर करण्यासाठी त्यांचे वडगाव तालुका पेण, जिल्हा रायगड येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक असल्याने तो मिळण्याकरिता तक्रारदार यांचे अशील यांनी ग्रामपंचायत अधिकारी, मळेघर, ता.पेण, जि.जिल्हा रायगड यांचे कडे दि. 17/03/2025 रोजी अर्ज केला होता. परंतु तक्रारदार यांचे अशील हे वयोवृद्ध असल्याने त्यांनी सदर असेसमेंट कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांचे नावे दिनांक 10/04/2025 रोजी कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले होते.
त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी लोकसेवक यांना दिनांक 10/04/2025 रोजी फोनवरून संपर्क करून नमूद कामा बाबत विचारणा केली असता लोकसेवक यांनी सदर कामाकरिता तक्रारदार यांचे कडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 10/04/2025 रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभाग येथे येऊन तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीनुसार आज दिनांक 11/04/2025 रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी लोकसेवक परमेश्वर सवाईराम जाधव यांनी रुपये 5000/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले… त्याप्रमाणे लगेच करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान नमूद आरोपी लोकसेवक यांनी 5000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारले नंतर रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही पेण पोलिस ठाणे, ता.पेण, जिल्हा रायगड येथे सुरू आहे…