मुंबईतील कुर्ल्यात जितेंद्र टाक यांचा संशयास्पद मृत्यू… जवळच्याच व्यक्तींनी जितेंद्र टाकचा खून केल्याचा कुटुंबीयांचा संशय…

0
68

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

मुंबईतील कुर्ल्यात एस.आर.ए. प्रकल्पाअंतर्गत नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते…यापैकी स्थलांतरित जितेंद्र टाक (४२) येथील प्रिमीयर कॉलनीतील “कोहिनूर सिटी” इमारत क्रमांक ७ मध्ये राहवयास आले होते.मात्र एक दिवस जितेंद्र टाक आपल्या घरून रात्री ८.०० घ्या सुमारास आपल्या राहत्या इमारती बाहेर पडले… परंतू बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतातूर झाले.रात्री ८.०० वाजता घरातून बाहेर पडलेले जितेंद्र टाक उशीरा पर्यंत परतले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

दुसरा दिवस उजाडला अंधार पडला तरी जितेंद्र टाक यांचा मागमूस नव्हता. जितेंद्र यांना मद्यपानाची सवय होती, मात्र त्यापलीकडे त्यांना कोणी शत्रू नव्हताच असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या विनोबा भावे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी मिसींग केस म्हणून तक्रार नोंद करून तपासकार्य सुरू केले.
दरम्यान काळजीपोटी जितेंद्रची नातलग मंडळी पोलीस स्टेशनमध्ये वरचेवर खेटा घालू लागली. त्यामुळे पोलिसांनी या मंडळींना सारखे येऊ नका म्हणत आम्ही आमच्या परिने शोधकार्य करीतच आहोत, स्थानिक एरियातील सीसीटीव्ही फुटेजवरून अंधारामुळे हाती काहीच लागले नाही तरीही धागेदोरे हाती लागताच आम्हीच तुमच्याकडे येऊ असे सांगत आश्वासन दिले.पण टाक परिवाराचा होरा होता की पोलीस तत्परता दाखवत नाही आहेत, आणि त्यांचा नाराजीचा सूर बळावला. जितेन्द्रची पत्नी, मुले, आई, भाऊ अस्वस्थ झाले होते. असे करता तब्बल एक आठवडा या गोष्टीला झाला.. पण जितेंद्र पाकचा पत्ता लागेना.

अशातच या मंडळींनी शोध घेता ते जवळच्याच खंडहारगत इमारती पर्यंत पोहोचले. या अर्धवट किंवा अपूर्ण इमारतीच्या लिफ्ट साठीच्या कॅबिन पर्यंत पोहोचले असता एक भयानक सत्य त्यांच्या नजरेस आले.या अपूर्ण इमारतीच्या लिफ्टच्या कॅबिनमध्ये पूर्ण सडलेल्या अवस्थेत, अंगावर फक्त पॅन्ट असलेल्या आणि रक्ताने माखलेल्या, किडे पडलेल्या भयाण अवस्थेत बेपत्ता जितेंद्र टाक यांचा मृतदेह आढळला.

जितेंद्र टाक यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने नातेवाईक, मित्र मंडळी, नागरिक उपस्थित होते.मृत जितेंद्र टाक यांच्या बायकोचे, भावाचे, आईचे, वाहिनीचे, नातेवाईक, आणि मित्र मंडळी व सदर इमारतीमधल्या सगळ्या रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या माणसाचा मृतदेह अशा प्रकारे मिळाला नसून आतापर्यंत तब्बल २० मृतदेह अश्या अवस्थेमध्ये आढळून आलेले आहेत. आम्हाला अश्या सोसायटी आणि इमारती मध्ये राहायला घरे मिळाली परंतु आमच, आमच्या कुटूंबाच काय? आमच्या सुरक्षेच काय? ५, ६ इमारती सोडल्या तर सर्व इमारती बंद पडलेल्या, अर्धवट बांधकाम असलेल्या अवस्थेमध्ये आहे.

आम्ही मोठया दुःखात अडकलोय…. आम्हाला न्याय पाहिजे, आज माझा पोटचा मुलगा गेलाय, माझा नवरा गेलाय, दोन तान्हूल्या पोरांना पोरंक करून गेलाय, तर आम्हाला न्याय पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार आणि या एसआरए प्रकल्पचे अध्यक्ष यांना एकच विनंती करतो कि आमच्या परिवाराला न्याय मिळवून दया. त्याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकरच अटक करा, पुन्हा असले प्रकार होणार नाहीत याची दखल शासनाने त्वरित घ्यावी.